हिंदू धर्मात श्रावण महिन्यास अतिशय महत्व आहे.कारण श्रावणात अनेक सण असतात.दिव्याच्या अमावस्या पासून सुरू होऊन बैल पोळ्या पर्यंत सण असतात.
सासरी काही जास्त व्रत वैकले जास्त केली जात नव्हती. वडील माळकरी होते.म्हणून माहेरी मात्र महिनाभर देव देव चालू असायचे. दिव्याच्या अमावस्या पासून सुरवात व्हायची.मातीचे घर आधी पूर्ण सारवले जायचे.जमीन शेणाने सारवली जायची.एकदम प्रसन्न वाटायचे. वापरात नसलेले दिवे मग बाहेर काढून घासून स्वच्छ केले जायचे. आजच्या सारख्या मोठ्या समया नव्हत्या तर मोठे मोठे दगडी दिवे होते. ज्याचे वजन अर्धा किलोच्या आसपास तरी असेल ,त्यात पाव किलो तेल सहज बसायचे.काचेचे दिवे,कंदील घासून लख्ख केले जायचे. पूजे पासून खरा श्रावण सुरू व्हायचा.घरात लाईट नव्हतीचं त्यामुळे प्रकाश देणारा दिवा देवा सारखा वाटत असायचा.माझे वडील हे आजोबांनी सोळा सोमवार व्रत केल्या मुळे झाले असे वडील सांगत, तेव्हा पासून गावातील मंदिरात पूर्ण श्रावण महिना नंदादीप लावला जायचं अर्थात ते काम गावातील गुरव करायचे.त्यांना महिना भर पुरेल एवढे तेल दर वर्षी दिला जात असे.
खरे तर श्रावण महिन्या मध्ये शेतात खूप काम असायचे.त्यामुळे वडील दर वर्षी रात्री नवनाथ ग्रंथाचे पारायण करायचे. संध्याकाळी शेतातून घरी आल्यावर जेवण झाले की पोथी वाचन सुरू होयचे.त्याकाळी आजच्या सारखे टीव्ही नव्हते .त्यामुळे जर कोणाची घरी पोथी असेल तर आजूबाजूचे सगळे पोथी ऐकण्यास येत असायचे.पोथी वाचताना नुसती न वाचता त्यातील अनेक प्रसंग वडील समजून सांगयाचे.मी कधी नवनाथ पोथी वाचली नाही पण दर वर्षी ती ऐकून त्या मध्ये काय आहे हे आज पण
लक्षात आहे.पोथी समाप्तीला वाटली जाणारी खिरापत तेव्हा खूप आवडतं असायची.नागपंचमी सण म्हणजे मुला साठी आनंदच असायचा.एका छोट्या वाटीत मेहंदी भिजवायची कडेपेटीच्या काडीने ती लावायची.सकाळी उठल्या उठल्या मित्र मैत्रिणीनं दाखवायची.मोठ्या मोठ्या झाडाला बांधलेले झोके,त्यावर झोके घेण्याची मजा खूप वेगळीच असायची.
या महिन्यातील दुसरा सण जो घरात साजरा केला जायचा तो म्हणजे गोकुळ अष्टमी.
या दिवशी गंगेचे पाणी जी खरे तर गोदावरी आहे .तिचे पाणी कावडने आणले जायचे.मग ते गावात मिरवले जायचे.दुसऱया दिवसी चपाती आणि गूळ यांचा काला ज्याला मलिदा म्हणतात तो केला जायचा.घरातील देव्हाऱ्यात कनिफनाथाचे ताईत असल्याने देव्हाऱ्यातील देवाच्या आसनाचा कपडा आणि धागे बदलले जायचे.मंदिरावरील भगवा ध्वज बदलला जायचा .शिव मंदिरात शिव अभिषेक केला जायचा.आज पण घरात पोथी वाचली जाते आता वडील राहिले नाही.वहिनी न चुकता पारायण करते .मी लग्नाच्या आधी पासून शिवलीलामृत पोथीचे पारायण करते.अजूनही करते.वडिलांचे अनेक अध्याय पाठ होते त्याची मात्र आठवण येत राहते.
श्रावणा मधील शेवटचा सण बैल पोळा जो अमावस्याला असतो.या महिन्यातील सगळयात आवडता सण.आमच्या कडे असणारे बैल हे खूप गरीब असायचे त्यांना कोणी सोडत आणि बांधत.मग काय या दिवशी धमाल असे.त्यांना सजवणे .तयार करणे.त्यांच्या साठी पुरणपोळी बनवणे.आणि गावभर त्यांची मिरवणूक.
मला सगळ्यात आवडत असे ते सारवलेले अंगण त्यावरील रांगोळी.आज हि मन पुन्हा पुन्हा त्या अंगणात जाऊन पोहचते.अनेकदा पूजेला फुले नसायची तरी एक प्रकारची प्रसन्नता वाटायची जी आज किती फुलांची सजावट करून देखील वाटत नाही .नकळत मन मग त्या माहेरच्या अंगणात जाऊन पोहचते.
No comments :
Post a Comment