अभिजीत इनामदार यांचा एक लेख वाचून मला मुंबईत नवीन आली तेव्हाचे दिवस आठवले.लग्न होऊन दोन वर्ष झाले होते.मी नवीन ठिकाणी म्हणजे दादर जवळच्या नायगाव पोलीस कॅम्प मध्ये राहायला गेले होते.तळ मजल्यावरील खोली होती.माझा साठी पूर्ण नवीन.
एकच मजल्यावर 20 खोल्या होत्या.मजेची गोष्ट म्हणजे पोलीस बिल्डिंग असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रांमधील लोक होते.माझ्या समोर रत्नागिरीकडील बाजूला कोल्हापुर कडील तर दुसऱ्या बाजूला सातारा येथील.काही मालवणी.अनेकजणी माझ्या सारख्या गावाकडून आलेल्या.प्रत्येकीचा बोलण्याचा टोन वेगळाच.त्यामुळे नक्की काय बरोबर काय चूक समजतच नव्हते.सगळ्यांना आम्ही बरोबर असे वाटून दुसऱ्यांना नाव ठेवणे त्यांच्या बोलण्यावर हसणे हे चालू असायचे.नाशिक कडे पोळी भाजी म्हणतात म्हणून इकडे म्हटल्यावर हसणारे भेटले.पोळी नाही चपाती म्हणायचे नाही तर बोलयचे.वरण भात नाही डाळ भात.असे बरेच शब्दवर मला हसले गेले.त्यासाठी सरळ घाटी हा शब्द वापरला जायचा.घाटी याचा अर्थ घाटावर राहणारे.पण येथे घाटी म्हणजे गावठी या अर्थाने अनेक वापरतात.
मुंबई बद्दल फक्त ऐकून होते।शहरातील भाषा वेगळी असते हे माहिती होते पण इकडे कोणती एक भाषा नव्हती.पण येथे एक गोष्ट मात्र शिकले मुंबई ही कोकण विभागात येते.इकडे कोकणातील लोक जास्त त्यामुळे त्यांच्या मता प्रमाणे ते जे बोलतात ,करतात ते सगळे बरोबर असते.याचा कधी चांगला कधी वाईट खूप अनुभव आला.अजून पण येत आहे.
एक वर्षात तिथे राहण्यास आणि भांडणास कंटाळून मी ठाण्याला राहायला गेले.तिकडे सगळे रायगड जिल्ह्यातील तिथे अनेकजण "ळ "चा उच्चार ल करायचे.
सासू सासरे गावी गेले आणि मी पुन्हा मुंबई सेंट्रल येथे राहायला आले.इकडे सगळे कॅथलिक जास्त करून गोवा साऊथ इंडिया कडील.मग हिंदी जास्त.पण काही जे मराठी बोलतात ते खूप अजीब असते.आमची मद्रासी आंटी बोलते" मी कसा पन बोलू दे तुला समजा ना "
खरे तर मुंबई सगळ्यात मोठे शहर पण येथे कोणती एक शुद्ध भाषा कोणी बोलत नाही सगळी खिचडी.मराठी बोलणारे अर्धे इंग्लिश वापरतात.
पुण्याची भाषा शुद्ध असे बोलले जाते.पण आता राज्यातील कानाकोपर्या मधून मुले तिथे शिकायला आणि कामा साठी येतात.त्यामुळे तिकडे अशीच मिक्स भाषा ऐकायला मिळते.
मला या मधून एकच समजले तुम्ही काय बोलता हे समोरच्याला समजले पाहिजे बस.नाही तर साऊथ कडील भाषा ऐकताना आणि वाचताना "आपण अडाणी आहे,काळे अक्षर म्हैस बराबर"
परक्या भाषा बरोबर ना तुमची शुद्ध ना अशुद्ध भाषा चालते.काही बोलले तरी ना समोरच्याला समजते.ना ते काय बोलतात आपल्याला.
No comments :
Post a Comment