व्यक्ती ही समूह प्रिय असते.त्याला आवडते समूहात राहणे म्हणून तो नेहमी साथ शोधत असतो. त्यातच खुश राहण्याचा प्रयत्न करतो. आयुष्य चालू राहते. माणसे भेटत जातात नंतर लक्षात येते भेटलेली सगळी माणसे आपली नसतात. काही आपलेपणा दाखवतात काही दिवसांसाठी तर काही केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून मैत्री करतात .पण तो त्यांचा खरा चेहरा नसतो. मग एक दिवस त्यांचा खरा चेहरा समोर येतो आणि मग आपल्याला प्रचंड दुःख होते कोणीतरी आपला वापर करून घेतला हे समजते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
आणि पश्चातापाशिवाय आपल्याजवळ काही उरत नाही.
आयुष्य असेच चालू राहते. आयुष्याच्या वाटेवर असेच लोक भेटत जातात.अनुभवाचे धडे शिकवून जातात तरीही समूहामध्ये राहण्याच्या सवयीमुळे आपण पुन्हा पुन्हा मैत्री करत राहतो. नवीन कळपात दाखल होत राहतो मग वाटते खरच आपल्याला कुणाची गरज असते का ?? का जगू शकत नाही आपण एकटे ??आपण एकटेपणाला घाबरतो का त्याचे उत्तर होय !आपण एकटेपणाला घाबरतो .म्हणून आपण पुन्हा पुन्हा माणसांमध्ये सामील होतो.
मागे वळून बघताना जाणीव होते. का वागलो आपण असे ? याचे उत्तर आपल्याकडेही नसते .आपण मात्र चालत राहतो. आयुष्यही चालू राहते अनेक अनुभवायचे गाठोडे तयार होत राहते.
असेच मनातले काही
No comments :
Post a Comment