माणसे जोडण्याचे सगळ्यात प्रभावी साधन म्हणजे भाषा .आणि वाणी ........
अनेकदा व्यक्ती चांगली असते .त्याचे व्यक्तिमत्व देखील चांगले असते .तो चारचौघात उठून दिसणारा देखाणा/देखणी असते .बघता क्षणी लोकांना आवडणारे .आणि काही काळ आवडतात देखील .पण जर भाषा चांगली नसेल तर ,काही काळात लोक कंटाळतात .कारण त्यांच्या व्यक्तीमत्वला विसंगत त्यांची भाषा असते .शब्द जोडतात शब्द तोडतात .
मितभाषी असणे चांगले पण .स्वस्तुती करणारे असतील तर त्यांची मितभाषां पण नको वाटते .मितभाषी असणे आणि वाचाळ असणे यात पण फरक असतो .अति बडबड करणारे पण लोकांना नको होतात .
याउलट आम्ही रोखठोक आहे म्हणून कठोर भाषाचा वापर करणारे ,दुसऱ्याने लागेल असी भाषा वापरणारे देखील लोकांना नको वाटतात .
माणसांनी माणसात राहण्या साठी त्यांच्या बरोबर सवांद साधताना त्यांना जोडताना .नेहमी समोरची व्यक्ती कशी आहे बघून सवांद साधला तर आपण कोणत्या व्यक्ती बरोबर जोडले जाऊ शकतो .खेड्यातील व्यक्ती बरोबर त्याच्या पातळीवर जावून बोललो तर सवांद होवू शकतो पण जर त्याच्या बरोबर आपण शेअर मार्केट बद्दल बोलायला गेलो तर आपण त्याच्या बरोबर बोलू शकू का ? अर्थात नाही .एखाद्या स्री ला घर आणि स्वयपाक याबद्दल जास्त आवड आहे माहिती आहे तिला नोकरी करताना काय समस्या येतात हे माहिती नसतात .म्हणून जर तू घरात बसते तुला काही कळत नाही असे म्हटले तर हा तिचा अपमान होणार आणि तिच्या बरोबर सवांद होणे शक्य नाही .
म्हणून खरी गरज आहे तुम्ही कुठे आहात .कोणत्या क्षेत्रातील अथवा कोणत्या वयोगटातील लोका बरोबर बोलता यावरून तुम्ही समोरील व्यक्ती बरोबर कसे वागायचे हे जर ठरवले तर तुम्ही अनेक माणसे जोडू शकतात .तुम्ही खूप चांगले असून उपयोग नाही हे सगळे जमले तर लोक देखील तुम्हाला चांगले म्हणतील .
अर्थात कोण चांगले कोण वाईट हे ठरवणे प्रत्येक व्यक्ती सापेक्ष असते .एकाला चांगली वाटणारी व्यक्ती दुसऱ्यांना चांगली वाटेलच असे नाही .
असेच मनातले काही .
22 फेब्रुवारी 2017
No comments :
Post a Comment