Tuesday, 12 January 2016

भोगीची भाजी

भोगीची  भाजी
साहित्य  -
पातीचा  कांदा  {छोटी जुडी }
वाल शेंगा { श्रावण घेवडा } एक वाटी 
एक मिडीयम  वांगे 
ओले हरभरे { चणे } एक वाटी 
गाजर तुकडे एक  वाटी ,एक वाटी कापलेले बटाटे .
वाटण -हिरव्या मिरच्या पाच सहा { तिखटा नुसार }
भाजलेले ५० ग्रम शेगदाणे  आणि  भाजलेले सफेद तीळ ५० ग्रम ,एक चमचा  जिरे .
वाटण जाडसर असावे .पाणी टाकायचे नाही 
कृती 
सगळ्यात  आधी  भाज्या धवून घ्याव्यात .वाल शेंगा चणे वाफवून पाण्यात वाफवून घ्यावे .कांद्याची  पात  आधीच  धवून चाळणीत  पाणी  निघून  जाण्यास ठेवावी .काढाईत थोडे  तेल टाकून त्यावर वांगी {तुकडे केलेलं }आणि गाजर वाफवून घ्यावे .बाजूला काढून ठेवावी .काढाईत पातीचा कांदा टाकून परतवून घ्यावा पूर्ण पाणी नाहीसे झाले कि तेल टाकावे .त्यात वाटलेले वाटण टाकावे .चांगले मिक्स झाले  कि वाफवलेल्या सगळ्या भाज्या  मिक्स  कराव्या .चवीनुसार मीठ टाकावे .दहा मिनिट मंद ग्यास वर शिजू  द्यावी  .
{ हि भाजी माझी आई करत असे }

No comments :

Post a Comment