Wednesday, 13 January 2016

तिळाचे लाडू

तिळाचे लाडू .............
साहित्य .
पाव किलो सफेद तीळ ,{ पॉलिशचे किवा साधे तीळ }पाव किलो चिक्की  गुळ ,
१०० ग्राम शेंगदाणे ,५० ग्राम भाजलेली डाळ .एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस .
 ४-५  वेलदोडयांची पूड  एक चमचा तूप

 कृती - आधी शेगदाणे भाजून घ्यावेत ,त्याचे अर्धे तुकडे करावे ,खोबरें मंद आचेवर भाजून घ्यावे .मंद  आचेवर तीळ बाजून घ्यावे.जाड बुडाच्या काढाईत एक चमचा तूप टाकावे त्यात गुळ टाकावा मंद आचेवर पाक करावा मध्ये मध्ये सतत हलवत राहावे .पाक जास्त पण उकळू देऊ नये नाही तर लाडू  कडक होतात. पाकात सगळे मिश्रण एकत्र करावे.आणि लाडू वाळवावे .लाडू करातांनी मिश्रण थंड झाले तर परत थोडे गरम करावे 

No comments :

Post a Comment