आज शिक्षक दिन ..
शिक्षण देवून या जगात लायक बनवतात ते शिक्षक .असे कोणी नसेल ज्यांना आपले शिक्षक आठवत नसतील .आज शिक्षक मुलांना शिक्षा करू शकत नाही .पण एक काळ होता आपण जे शिकवतो ते मुलांना आलेच पाहिजे असा आग्रह असे आजच्या सारखे तेव्हा गुगल किवा संगणक नव्हते .मग मुलांना बेरीज, वजाबाकी,गुणाकार ,भागाकार,आलाच पाहिजे त्या साठी प्रथमिक शिक्षक हे पाढे शिकवत ते आलेच पाहिजे म्हणून रोज म्हणून घेत .नाही आले का छड्या खायला लागत .मग भितिनी पाढे पाठ केले जात .आज देखील हिशोब करतांनी त्याचा किती उपयोग होतो .
आणि आठवतात आमच्या प्राथमिक शाळेतील आमच्या बाई .आजच्या मुला सारखा आम्हाला त्यांचा कधी राग येत नव्हता उलट तेव्हा पण आदर होता आज पण आहे .
माध्यमिक शाळेतील शिक्षकांना तर आम्ही आज पण विसरू शकत नाही .एक वेगळा जमाना होतो तो .एखादा मुलगा आला नाही तर तो का आला नाही म्हणून दुसऱ्या मुलांना त्यांना का आला नाही हे बघायला पाठवत .मुलांना फी साठी पैसे नसेल तर स्वता देत असत .जादा तास घेत .प्रत्येकाच्या घरी लाईट नाही हे माहिती असे .त्यांचा अभ्यास झाला पाहिजे म्हणून रात्री अभ्यासिक चालू ठेवत .
सगळ्या कडे घड्याळ नाही म्हणून बोर्डिंग मधील मुलांना पाहते उठवायला जाणारे आमचे शिक्षक आज पण आठवतात .दुसऱ्या गावात बोर्ड म्हणून बोर्डिंग च्या मुलाना स्वताच्या घरातून डबा माग वणारे ,अभ्यास करत नाही म्हणून मारणारे परंतु निरोप समारंभ वेळी रडणारे आमचे शिक्षक .कधी त्यांना आम्ही विसरू शकत नाही .त्या आमच्या शिक्षकांना आणि त्याच्या हाता खाली शिकून आज शिक्षक असणारया सगळ्या शिक्षकांना .शिक्षक दिनाच्या शुभेछ्या.

No comments :
Post a Comment