आज होळी .....
होळी म्हणजे पुरणपोळी हवीच हवी ,आज देखील मराठी लोका मध्ये बनवलीच जाते ,पोळी बनवणे पण एक कला आहे असेच म्हणायला हवे .किती सोपस्कार करून तयार होते पुरण पोळी ....मला पुरण पोळी आवडत नाही ,म्हणून आई किती रागावली किती ओरडली तरी लग्न आधी मी कधी पुरण पोळी लाटून बघितली नाही .शक्यतो होळी असते तेव्हा शेतातील बरेच काम आटोपलेली असतात .पूर्वीच्या काळी लोक जास्त करून गावात राहत .आजच्या सारखे वस्त्या जास्त नव्हत्या .शेतातील बाजरी गहू किवा बाकी सगळे गावात वाहून नेले जात असे,ते जिथे ठेवत किवा तिथेच ते तयार करत असत त्याला खळे म्हणत .म्हणजे काय होळीच्या वेळी लोक थाडे रीलेक्स असत .धान्य तयार झालेले असे लोक आनंदात असत .झाडाची जुनी पाने सगळे गळून गेलेली असत .नवीन पालवी येण्यास सुरवात झालेली असे .अशा वेळी येणार हा सन मग पुरण पोळी केली जात असावी .माणसे जास्त असत मग कुणा कडे एक किलो डाळीचे नाही तर त्या पेक्षा जास्त पुरण केले जात असे .आजच्या सारखे gas नव्हते मग रात्रीचे जेवण दुपार पासून सुरु होत असे .चुलीवर डाळ शिजत घातली जात असे .डाळ शिजवून झाली कि त्यातील पाणी बाजूला काढून ठेवले जाई .त्याची कटाची आमटी {ज्याला आमच्या कडे सार म्हणतात }बनवली जाते .डाळी मध्ये गुळ बारीक करून टाकला कि ती डाळ चुली समोर चुलीतील आहार बाहेर काढून त्यावर काही वेळ ठेवत .गुळ थोडा मिक्स झाला कि वेलची ,सुंठ घातली कि झाले पुरण मग ते पाट्यावर वाटयला लागत असे .येथ पर्यंतचे काम नेहमी माझ्या कडे असे .पुरणपोळी साठी पीठ अलग पद्धतीने भिजवले जात असे .आजच्या सारखा त्यात मैदा मिक्स केला जात नसे .पीठ आधी चाळणीने चाळून नंतर ते पुन्हा पातळ कपड्याने चाळून घेतले जात असे .मग ते भिजवले म्हणजे मळून घेतले जात असे .नंतर सुरु होत असे म्हत्वाचे काम आणि ते म्हणजे पोळ्या लाटणे जे मला अजिबात आवडत नसे .मला पुरण पोळी आवडत नाही मग मी का करू ?असे मी म्हणत असे यावर आईचे ठरलेले उत्तर नवर्याच्या घरी जायचे आहे ना ?सगळा स्वयपाक येतो आणि जर पुरण पोळी नाही आली तर काय उपयोग .पोळी पण कशी हवी पीठ कमी आणि पुरण जास्त ....पोळी असी नुसती हातात घेतली तरी तुटली पाहिजे .तोडायला नाही लागली पाहिजे .आई अशाच पोळ्या करत असे भरपूर पुरण आणि कमी पीठ ..मैदा अजिबात नसे त्यामुळे ती अनेकदा पोळी फुटण्याची जास्त शक्यता जास्त आसायची ...एकच वेळी पोळी लाटायची पण आणि ती भाजायची हे कैशाल्याचे काम असे .कारण चुलीवर या दोन्हीचा ताळमेळ बसवणे खूप अवघड काम असते .आणि ते मला जमत नसे .म्हणून मी करतच नसे .लग्न झाले सासू उत्तम जेवण बनवत असे.माझी आई छान पुरण पोळी बनवते आणि मला पुरणपोळी खूप आवडते असे नवऱ्याने सांगून टाकले .आता काय करणार करायला पाहिजे ....डाळ शिजवली गुळ मिक्स केला पण आता येथे तर चुलीतील आहर नाही मग काय करायचे सासूला विचारले ती बोलली gas बारीक करून त्यावर ठेव .हळूहळू गुळ पातळ झाला .बापरे जास्त पातळ झाले आता काय ?मला तर काही समजेना काय करू ,सासूला कसे विचारू ,तुझा आईने तुला शिकवली नाही का ?असे जर बोलली तर ,उगीच आईचे नाव मध्ये नको यायला आता काय करू समजेना .परतू हलवत राहिले आणि हळूहळू पुरण परत घट्ट झाले .आणि माझ्या जीवात जीव आला .पीठ मळतानी नुसते पीठ नाही तर त्यात अर्धा मैदा घेतलेला असे .त्यामुळे पोळी करातांनी पोळी अजिबात फुटत नव्हती .मला खूप गम्मत वाटली .आणि पोळी लाटणे मला खूप सोपे वाटले .तेव्हा पासून ते आता पर्यंत पोळ्या मस्त जमतात ,तरी आई सारख्या नाही जमत .मी मैदा न टाकता पुरण पोळ्या करण्याचा प्रयत्न करते .स्वता करून सुद्धा आज देखील मला पोळी आवडत नाही .हुश्य संपले एकदाचे पुरण पोळी प्रकरण ..................

No comments :
Post a Comment