मुंबईतील एक हॉस्पिटल ,बाहेर प्रचंड गर्दी परंतु आता मध्ये एक भीतीदायक शांतता.
काळजीने बसलेले चेहरे ,नर्सची धावपळ औषधाचा वास ...पहिल्या मजल्या वरील महिला वार्ड नंबर आठ ....त्या वार्ड मध्ये ४ नंबर बेडवर कोपर्यात ती .दहा खाटा असलेले ते छोटे वार्ड होते .त्यातील एका कोपऱ्यात तिची खाट होती .कोण होती ती कोणाला माहिती नव्हते ,ती कोणाशी बोलत नसे .पण खूप दिवसा पूर्वी तिला कोणी तरी येथे सोडून गेले होते .परत बघयला आलेच नाही .कोणाशी बोलत नसे ती तीच्या कडे नर्स पण जास्त जात नसत ,फक्त तिला रोजच्या गोळ्या दिल्या जात असे .साधारण पाच फूट उंच असेल ती ,आजारी असून तब्यातीने कृश झाली तरी मुळात ती खूप सुंदर असावी .गोरी काळे भोर मस्त केस ,आणि कोणच्या नजरेत भरणारे तिची अतिशय सुंदर डोळे ,हो तिचे डोळे खूप सुंदर होते बघता क्षणी कोणाला आवडावे .पाणीदार काळे डोळे ,मृगनयनी म्हणावे असे .कोणी तिला बघून "हिचे डोळे काय सुंदर आहे असे बोलत "पण त्या डोळ्यात एक हतबलता आणि उदाशी नेहमी दिसत असे .कोणाची तरी वाट बघत असल्या सारखे कोणच्या तरी प्रतीक्षेत असलेले .बाकीच्या पेशण्टला नातेवाईक भेटायला येत तिला कोणी भेटायला येत नसे .त्या वेळी तिच्या नजरेत एक व्याकुळता दिसत असे .काय झाले होते तिला ?तिला एड्स झाला होता .आणि हा आजार तेव्हा नवीन होता .त्याच्या बद्दल खूप काही माहिती नव्हती .त्या मुळे अशा लोकना कोणी हात देखील लावत नसत .त्या मुले नर्स देखील तिचा जवळ जात नसत .परंतु डॉक्टर मात्र तिला तपासात तीचाशी बोलत .आणि हेच कारण असावे ती कोणाशी बोलत नसे .आणि कोणी तिचा कडे बोलायला जात नसे .शांत पडून राहणारी ती मात्र एक दिवस रात्री उठली आणि सगळ्याचे सामान मध्ये काहीना काही घेतले आणि त्या सगळ्या वस्तू खाण्याच्या होत्या .कारण तिला हॉस्पिटल मध्ये जेवण मिळत असे तेच ती खात असे .सकाळी झाली सगळ्यांना समजले तिनी कोणाचे ना कोणाचे काही घेतले .काही काही बोलल्या नाही परंतु स्वतचा विचार करणाऱ्या त्यांना नाही आवडले तिनी त्यांच्या वस्तूला हात लावला ते .मग त्यांनी तिची कॉम्प्लेंत केली .मेन नर्स तिला ओरडली .तरी ती काही बोलली नाही पण तेव्हा तिचा डोळ्यात जगाचा राग दिसला .आणि त्या रात्री मध्यरात्री तिने अचानक जोरजोरात ओरडण्यास सुरवात केली .आदळआपट सुरु केली .नर्स धावत आल्या सगळे उठले .ती कोणाचे ऐकत नव्हती .डॉक्टरांना बोलावले गेले तिला ऑक्सिजन मास्क लावला गेला झोपेचे इंजेक्शन दिले गेले .ती नंतर शांत झाली .दुसर्या दिवशी ती तशीच पडून राहिली .परंतु रात्री ११ वाजले आणि तिनी मास्क काढून टाकला .ऑक्सिजन सिलेंडर लातेने पडून दिले .आता तीची धडपड चालू होती ,खूप व्याकूळ झाल्या सारखी .आज ती प्रथमच माझी मुले ,माझी मुले असे काही बडबडत होती तिची ती हाल बघून सगळ्यांना खूप वाईट वाटले कदाचित तिला मुले असावी आणि तिला त्यांची आठवण येत असावी .डॉक्टर आले परत तिला इंजक्शन दिले मास्क लावला ,परंतु तिची ती धडपड शेवटची ठरली .सकाळी सगळे उठले तेव्हा समजले ती रात्रीच कधी या जगातून गेली .तिची बॉडी घायला आले तेव्हा ,सगळ्यांनी बघितले .तिचे ते सुंदर डोळे तसेच उघडे होते .कोणाच्या तरी प्रतीक्षेत असल्या सारखे ......{एड्स झालेली व्यक्ती जगत नाही ,तिनी काही चुकीचे वागले असणार म्हणून तिला हा आजार झाला हा एक मोठा समज होता .म्हणूनच तिला कोणी सोडून गेले असेल का ?कोणी आपल्यला पापी म्हणून नाही म्हणून ती कोणाशी बोलत नसेल का ?असे खूप प्रश्न सोडून ती गेली .}आशा १४/३/१५
No comments :
Post a Comment