आज आमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यांचा बघितलेला सगळ्यात पहिला चित्रपट आठवला ."गरम मसाला" असे त्या चित्रपटाचे नाव होते.
1980 किंवा 81 असे कुठले तरी वर्ष चालू होते .नक्की आठवत नाही .आमचे गाव छोटे होते. त्यामुळे गावात साधा टीव्ही कोणाकडे नव्हता.तर चित्रपट गृह असणे खूप दूरची गोष्ट होती.
चित्रपट बघण्यासाठी गणपती येईपर्यंत वाट बघावी लागायची. कारण गणपती बसल्यानंतर गावातील दोन गणपती मंडळ होते.ते वेगवेगळी चित्रपट दाखवायचे .त्यात जास्त करून संत पुंडलिक संत तुकाराम अशा प्रकारचे धार्मिक चित्रपट असायचे. फार फार तर जयश्री गडकर सूर्यकांत यांचे चित्रपट दाखवले जायचे. हिंदी चित्रपट दाखवले जात नव्हते …त्यामुळे हिंदी चित्रपटा विषयी कधीतरी कुठेतरी भेटलेल्या मायापुरी मध्ये वाचायला मिळायचे.
गावामध्ये बदली होऊन आलेले बँकेतील लोक शाळेतील शिक्षक आणि पोलीस यांची मुले जेव्हा वर्गात नवीन यायचे .तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून अनेक चित्रपटांच्या कथा ऐकायला मिळायच्या. हेमा मालिनी असेल अमिताभ बच्चन असेल नाहीतर अजून कुठला हीरो त्यांच्या बद्दल ऐकायला मिळत असे.पण हेमा मालिनी येवढी फेमस होती त्याकाळच्या बायका जर एखाद्या मुलीने केसांची बट काढली तर तिला स्वतःला का हेमामालिनी समजते का आकडे पाडते. असे नक्की बोलायचे खरं तर हे पिक्चर मध्ये कशी दिसते हे ही माहिती नव्हते.रामायण टीव्ही वर आले आणि गावात व्हिडिओ वर चित्रपट दाखवणे सुरू झाले.पन्नास पैसे तिकीट असायचे पण आम्हाला कधी ते बघायला जायला परवानगी नव्हती.
गणपती बसायला अजून दोन महिन्यांचा अवकाश होता. तेच गावात बातमी आली अमिताभ बच्चनचा पिक्चर दाखवणार आहे. यावर्षी गणपती मध्ये मग काय सगळीकडे तीच चर्चा, मंगळवारी आमच्या गावचा बाजार असायचा .बाजाराच्या दिवशी आजूबाजूच्या खेड्यातील लोक बाजारासाठी यायचे .त्यांना देखील समजावे म्हणून जेव्हा कधी चित्रपट दाखवला जायचा. तेव्हा दिवसभर भोंग्यावरून पुकारले जायचे. ती सूचना भारी असायची…
" ऐका ऐका ऐका आणि लक्षात ठेवा . वावी आणि वावी पंचक्रोशीतील लोकांना कळविण्यात येते की अमिताभ बच्चन यांचा गरम मसाला हा पिक्चर ,अमुक तारखेला रात्री साडेनऊ वाजता वडाच्या झाडाखाली फुकट दाखवण्यात येणार आहे .(ही आमच्या गावात फुकट चित्रपट दाखवण्याची जागा होती.तर कधी एसटी स्टँड वर) अशाप्रकारे दिवसभर भोंग्यावरून ही सूचना दिली जायची. गावात असलेले दोन बोर्ड त्यावर देखील लिहून ठेवले जायचे बाहेरगावचे लोक ते पक्के लक्षात ठेवायचे.
गरम मसाला हा चित्रपट दाखवण्याचा दिवस एकदाचा उगवला .रात्री साडेनऊ वाजता ही वेळ जरी पुकारलेले असली गावातील अनेकांकडे त्यावेळी घड्याळ्याच नव्हते .अंधार पडल्यानंतर एक तासानंतर म्हणजे साधारण साडेसात आठ च्या दरम्यान पूर्णा मैदान भरले. समोर पडदा लावलेला होता कधी पिक्चर सुरू होतो याची लोक वाट बघत होते .कारण सगळे पहिल्यांदीच अमिताभ बच्चन ला पडद्यावर बघणार होते. एकदाचा पिक्चर सुरू झाला पिक्चर सुरू अर्धा-पाऊण तास झाला असेल, पडद्यावर जीवन अरुणा इराणी ला सांगत होता "नाचो" त्यावेळी अरुणा इराणी मै नही नाचूंगी असे म्हणते आणि त्याच वेळी धो धो पाऊस सुरु झाला .लोकं पिक्चर बघण्यात एकदम गुंग झाले होते. आणि अचानक आलेल्या पावसामुळे सगळे गायब झाले. कारण पडदा भिजला होता काही वेळाने पाऊस थांबला काही लोक परत जमा झाले. पण पडदा भिजल्यामुळे पुढचा पिक्चर दाखवला गेला नाही .दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या तोंडी अमिताभ बच्चन ची चर्चा होती. त्याचबरोबर "गरम मसाला पावसाने गार करून टाकला म्हणून हसत होते"
पुन्हा आठ दिवसांनी तो चित्रपट दाखवला जाणार म्हणून त्याची वेळ आणि तारीख पुकारली गेली… पुन्हा तेवढ्या संख्येने लोक हजर झाले . जिथपर्यंत पिक्चर बघितला होता .त्याच्या थोडा पुढे गेल्यानंतर अचानक लाईट गेली. आत्ता लाईट येईल मग लाईट येईल .म्हणून लोक बसून राहिले. पण एक तास झाला तरी लाईट आली नाही .मग कंटाळून लोक घरी निघून गेले. अशा प्रकारे दोनदा चित्रपट पूर्ण झालाच नाही. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा हा चित्रपट दाखवला गेला. अशा प्रकारे एकदाचा अमिताभ बच्चन यांचा तो चित्रपट लोकांनी बघितला. मध्ये काही वर्षे गेली. जुन्या गणपती मंडळातील सदस्यांची जागा तरुण मित्र मंडळ आणि घेतली .आणि त्याचबरोबर अमिताभ बच्चनचा दिवार, जंजीर आणि अनेक चित्रपट गावातील मोकळ्या जागेत जमिनीवर बसून बघितले .त्या काळामध्ये चित्रपट बघण्याचे ते एकमेव साधन होते. आणि त्यातही एक वेगळी मजा होती. त्यावेळी हे देखील माहीत नव्हते अजून तीस-पस्तीस वर्षाने सुद्दा आपण या माणसाला पुन्हा काम करताना बघणार आहे.ते लगेच चित्रपट रिलीज झाल्या बरोबर.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.बच्चनजी💐💐💐

No comments :
Post a Comment