Saturday, 23 May 2015

बायको माहेरी जाते तेव्हा

फेसबुक वर आपण काही पोस्ट बघतो ,
त्यामुळे अनेक लोक गावी जातात त्यात जास्त करून बायका आणि मुले 
असतात .ते गावी गेले म्हणून पुरुष म्हणजे नवरे लोक खूप खुश होतात .
त्यांना खूप आनंद होतो अशा एक सूर दिसतो .
का बरे असे ? का असे वाटते ?
अनेक करणे असतात त्या मागे ,पण सगळ्यात महत्वाचे एक कारण असते ते

 म्हणजे कधी तरी एकटे राहावे वाटते .अगदी उठल्या पासून कोणी काही बोलू नाही .
कोणती वस्तू कुठे टाकून दिली तरी उदा .टॉवेल .सकाळी उठावे मस्त पेपर वाचत बसावा ,
चल उशीर होतो लवकर अंघोळ करा म्हणून मागे भुणभुण नाही .{पण बायको का भुणभुण
 करते याचा कधी विचार केला आहे का ?}
नावडती भाजी डब्यात घेऊन जायला नको .घरी कधी आले तरी टेन्सन नाही ,

मित्रांना फोन करावे मस्त पार्ट्य करावी हवे ते खावे कधी घरी यावे .असे वाटते
पण खरच हा आनंद किती दिवस टिकतो मनाला विचारा ....
काही दिवस ठीक वाटते नन्तर काय ....
घरातील मुलांची आठवण येते ,खाली घर मग खायला उठते ,
कामावरून आले कि रिकामे घर खायला उठते .
बाहेरचे खाऊन कंटाळा येतो .
मग आझादी नको वाटते.परत कोणी तरी आपल्यला सांगावे ,हट्ट करावा,
मुलांनी घरात गोंधळ घालावा.असे वाटते ना .
{मग बायको परत कधी येणार याची वाट बघायला सुरवात होते }
असेच मनातील काही

No comments :

Post a Comment