मी मागे एक पोस्ट टाकली होती बायको माहेरी जाते तेव्हा ......
आता त्यावर एक कॉम्मेंत होती नवरे जर बाहेर गेले तर बायकांना काय वाटते.
नवरा गावी गेला किवा बाहेर गेला तर बायकांना जास्त काही फरक जाणवत नाही.
कारण बायकांच्या कोणत्या कामात काही बदल होत नाही.जरी त्या एकट्या असल्या तरी
रोज जी कामे असतात ती करायला लागतातच.कारण नेहमी प्रमाणे मुलांच्या
शाळा किवा कोणते ना कोणते क्लास असतात.ते बघायला लागतेच.
हो एक फरक नक्की पडतो घरात नवरा असतो तेव्हा सगळा स्वयपाक बनवला
जातो पण नवरा नसेल तर काही तरी {खिचडी भात }असे बनवले जाते.
नवरा गेला तरी त्याला सूचना देणे हे एक काम चालू असते.
सांभाळून जा बाहेरचे जपून खा असेच काहीना काही .
पण अनेकदा वाटते बायकांना आपला पण असा एखादा दिवस असावा.
जो फक्त माझा असावा,सकाळी उठल्या म्हणजे स्वताला वाटले तेव्हा उठावे.
स्वताला हवा तसा चहा करावा,आवडतो तो नाष्टा करावा.मुलांच्या आणि नवऱ्याच्या
आवडी सांभाळता सांभाळता स्वताच्या आवडीची विसरून गेलेली एखादी
भाजी करून खावी.टीव्ही वर हवा तो चित्रपट बघावा.मग तो किती का जुना असो .
आवडीचे गाणे ऐकावे.हातात कोणते सामान न घेता बाहेर फिरावे.
आपल्या आवडत्या ठिकाणी मग ते गार्डन असो किवा चौपाटी तिथे जाऊन शांत
बसावे.
माझ्या शेजारी एक बाई राहते लग्नाला १६ वर्ष झाले.माहेरी एकत्र परिवार, सासरी सासू
सासरे दोन मुले आणि छोटे घर,मागे पिकनिक गेली घरातील सगळे गेले ती नाही गेली.
तिला विचारले का नाही गेली.
तिचे उत्तर होते आज मला एकटे राहायचे आहे,शांत पणे आणि आज तो मला भेटला आहे .
हे होते जास्त करून मुंबईत घर सोडून कुठे जागा नसते.
असा प्रोब्लेम गावाकडे सहसा येत नाही,मोठे घरे असतात.अंगण असते.
किती काही असले तरी बायकांना प्रिय असते आपले घर.
काही वेळा साठी माझा एक दिवस असावा असे वाटले तरी माझी मुले माझे घर
यापासून जास्त दूर त्या राहू शकत नाही हे पण खरे आहे.

No comments :
Post a Comment