प्रेम व्यक्त करण्यासाठी असलेले सण उत्सव .
आता स्त्री असो की पुरुष किती सहज प्रेम व्यक्त केले जाते.I Love You म्हटलं की झाले.किंवा अजून मिठी मारणे किस घेणे.बरे या साठी आता कुठे आहे याला जास्त महत्व राहिले नाही.म्हणजे काय स्त्री सहज आपले नवऱ्या वरील प्रियकरा वरील प्रेम व्यक्त करते.
पण अनेक वर्षे मागे जा.जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती.घरात दोन तीन सासवा,आज्जी सासू,नणंद जावा सगळे असायचे तेव्हा डोक्यावर पदर घेऊन वावरणारी स्त्री होती.स्वयपाक घर हेच तिचे अस्तित्व होते.बैठकीच्या खोलीत तिला जास्त प्रवेश नव्हता.मोठ्या माणसा समोर तिला आपल्या पती बरोबर बोलायला परवानगी नव्हती.तसे बोलणे मार्यदेत बसत नव्हते.
त्यावेळी तिचा दिवस मोठ्या पहाटे सुरू होत असे.जात्यावर दळण दळण्यापासून ते रात्री सर्व झोपल्या नंतर पूर्ण वेळ ती कामात असे.असा वेळी दिवसभरात कधी तरी तिला पती बरोबर बोलायाला मिळत असे नाही तर नाही.लहान वयात होणारी लग्न कुटुंब नियोजनाची कोणती पद्दत नसल्या मुळे दर वर्षी येणारे आईपण आणि त्यामध्येच जाणारा वेळ यामुळे आपल्या पती साठी देता न येणारा वेळ यातून पती बरोबर तिला घालवायला रात्रीचे काही तासच वेळ मिळत असायचे.
नवरा आपल्या बायकोचे कौतुक करण्यासाठी कधी तरी एखादे नवीन लुगडे घेऊन येत असे किंवा एखादा दागिना यातून तो सगळ्या समोर आपल्या बायको वरील प्रेम व्यक्त करत असे.आपण दिलेल्या वस्तू घालून जेव्हा बायको समोरून गेल्यावर त्याच्या नजरेतील प्रेम तिला दिसत असे.पण स्त्री असे काही करू शकत नव्हती.एकत्र कुटुंब म्हणून सगळ्यांना जे केले तेच तिला आपल्या नवऱ्याला वाढायला लागे.
मग सगळ्या समोर आपल्या पती बद्दल प्रेम व्यक्त करायला म्हणून काही सन असावे.जसा दिवाळी पाडवा ,संक्रात,हरितालिका,आणी वटपौर्णिमा असावे.
मला तुमची किती काळजी आहे.किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी वटपौर्णिमा हा सण असावा.अगदी बिनधास्त पणे पूजेची तयारी करायची छान पतीने दिलेले लुगडे चार दागिने घालायचे बाकी सख्या बरोबर सामूहिक पूजा करायची.गाणी म्हणायचे ज्यात आपल्या नवऱ्याचे गुणगाण गायचे.सगळ्या समोर नवर्याच्या नाव उखण्यातून घ्यायचे.त्याच्या पाया पडून त्याच्या बद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.
खरच किती छान होती कल्पना ना पती बद्दल सगळ्या समोर प्रेम व्यक्त करण्याची.आपली पत्नी फक्त आपल्या साठी तयार झाली .आपल्या साठी तिनी उपवास केला या भावनेने त्याला किती आनंद होत असेल ना? हा सगळा विचार करून वाटते खरच किती छान कल्पना होत्या ना या सगळ्या मागे.

No comments :
Post a Comment