Monday, 9 October 2017

न विसरता येण्या सारखे काही

छान सुंदर मैत्री असते .एकमेकांचे विचार आवडत असतात.एकमेकांचीदुःख शेअर केली जातात.अचानक अनेक वर्षाचा सहवास ,बरोबर राहणे यातून एकामेका बद्दल सहवासातून प्रेम होते.आवडी निवडी माहिती असतात.एकमेकांनासमजून घेतात.पण हे जर अविवाहित असतील त्यांचा साठी आयुष्याचा जोडीदार म्हणून मग हे एकमेका साठी परफेक्ट होऊ शकतात.पण तरुण वयात जर कोणाला कोणी तरी आवडत असेल .पण काही कारणाने जर ते सांगता नाहीआले तर.ते प्रेम तसेच मनातील कुठल्या कोपऱ्यात तसेच राहून जाते.आयुष्याच्या वाटा बदलतात.आठवणी मात्र राहतात.कधी तरी कुठल्या वळणावर पुन्हा ते प्रेम समोर येते.आयुष्यात खूप काही घडून गेलेले असते.पण जर आयुष्यात जोडीदार चांगला नसेल तर.पुन्हा कुठे तरी मनात दाबून राहिलेले प्रेम पुन्हा जिवंत होते.नकळत एकमेका बद्दल ओढ वाढते.पुन्हा आयुष्यातील सुखदुःखाचो देवाण घेवाण होते.पुन्हा नकळत जगावे वाटते.पण त्यावेळी आपल्या मागे आपला संसार आहे आयुष्यात जोडीदार आहे.याचा विसर पडतो.पण कधी कधी काही लोक जोडीदारा कडून साथ नसल्या मुळे दुःखी असतात.त्याच्या संशयोस्वभावा मुळे दुःखी असतात.असा लोकांचे आपल्या जोडीदारा वर खूप प्रेम असते.मग असे लोक जुन्या भेटलेल्या प्रेमी चा त्यांच्या भावनांचा वापर करतात.त्यांचा बद्दल आपल्या जोडीदाराला सांगतात.मग ते काही असो फोटो अथवा किती वेळ कॉल वर बोलतो हे सांगतात.त्यामुळे त्यांचा दुरवलेला जोडीदार त्यांना परत भेटतो.मग असेलोक जुन्या प्रेमी ला विसरतात.कधी तरी मेसेज करतात तर कधी कॉल .पण जेव्हा हे यांचा जोडीदाराला समजते तेव्हा तो त्या समोरच्या व्यक्तीला प्रचंडत्रास देते.असा वेळी समोरच्याला साथ देने तर दूर हे त्यांना एखादा मेसेज करून सांगतात.प्लिज तु माझा बरोबर कोणता कॉन्टॅक्ट करू नको.इमेल यांनी मेसेज सोशल मीडिया.कारण माझा जोडीदाराने सुसाईडचा प्रयत्न केला .जर काही झाले तर त्याला जबाबदार तू असणार.अगदी समोरच्याला काय वाटणार याचा काडीचा विचार न करता .समोरची व्यक्तीला याचा किती त्रास झाला असणारे याचा असे लोक विचार करत नाही.यांचा जोडीदार मात्र आपल्या माणसाची किती चूक हे बघत नाही.यांचा जोडीदार मात्र एवढ्या वर पण थांबत नाही .तर समोरच्या व्यक्तीच्या असेल नसेल त्या नातेवाईकांना फोन करून बदनामी करत असतात.असा वेळी हे लोक चूप बसतात.काही दिवस जातात.ही व्यक्ती जसे काही झाले नाही असे समजून पुन्हा जुन्या प्रेमीला मेसेज करतात.पण हे लोक हे विसरून जातात.ते विसरले असले तरी समोरची व्यक्ती काही विसरलेली नसती.तिनी त्या व्यक्तीचा शेवटचा मेसेज लक्षात ठेवलेला असतो .मला कोणता कॉन्टॅक्ट करू नाही.माझा जोडीदाराने जर सुसाईड केली तर त्याला तू जबाबदार असणार.आणि कधी विसरणार देखील नाही

1 comment :